आरती - श्रीविष्णुदासाची

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल - आरती ज्ञानराजा )
जयजय गुरुमूर्ती । पुरुषोत्तम सरस्वति ।
ओवाळूं महाराजा । जिवशिवात्मज्योति ॥ जयजय० धृ.॥
तुझे गुण - अनुवाद । गातां चारीहि वेद ।
म्हणती नेति नेति । मनीं पावूनि खेद ॥ जय० १॥
आदिमध्य आणि अंत । रहित तूं अनंत ।
जाणती ब्रह्मज्ञानी । स्वानुभवीक संत ॥ जय० २॥
रेणुका आदिमाया । पदीं वाहूनि काया ।
स्वरुपीं लीन होसी । केलें ‘ चरित्र ’ गाया ॥ जय० ३॥
देहांति केली लीला । शिरिं सिंहनाद केला ।
दाविली मोक्ष - वाट । बहु आनंद झाला ॥ जय० ४॥
विनवी ‘ गुरुदास ’ । माझें तुझ्या पदास ।
अखंड रत व्हावें ! मन न हो उदास ॥ जय० ५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP