आरती - आरती शारदेची

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


जयदेवी जयदेवी जय मंगल - निलये
ओवाळुं आरती कमलोद्भव तनये ॥ध्रु०॥
अनुपम सुंदर गुणगंभिर कोमलगात्रे
मयुरारुढ विराजसि पंकजदलनेत्रे
श्रीगंगातट बासरक्षेत्रीं सुपवित्रे
वससी उद्धरसी जड - मुढ दर्शनमात्रें ॥ जय० ॥१॥
वीणा पुस्तक शुभ्रांबर कंचुकि साजे
धुप, दिप, नैवेद्या क्षीर, साखर - घृत, सांजे
चौघडे घन वाजंत्रीं मृदंग दर वाजे
श्रवणें मोक्षपुरीचे उघडति दरवाजे ॥ जय० ॥२॥
तळपति कुंडल - युगलें मकराकृति कर्णीं
भरला अखंड करुणार्णव अंतः करणीं
लोपति मुकुट प्रभेतळिं उदंड शशितरणी
अवतरलिस तूं माये, भवसागर तरणी ॥ जय० ॥३॥
पुढें महासत्पुरुषासह मूर्ती व्यासाची
पहातां प्रपंचीं वितळे मति हव्यासाची
तूं दिनवत्सल, तूं जगज्जननि, सदा साची
तूं माउलि, प्रतिपाळक विष्णुदासाची ॥ जय० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP