मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|श्रीहरिगीता|तत्वविवेक प्रकरणम्| प्रारंभ तत्वविवेक प्रकरणम् प्रारंभ श्लोक १ ते ३ श्लोक ४ ते ७ श्लोक ८ ते ९ श्लोक १० ते ११ श्लोक १२ ते १४ श्लोक १५ ते १७ श्लोक १८ ते २२ श्लोक २३ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ३६ श्लोक ३७ ते ४२ श्लोक ४३ ते ४८ श्लोक ४९ ते ५२ श्लोक ५३ ते ५६ श्लोक ५७ ते ६० श्लोक ६१ ते ६४ श्लोक ६५ तत्वविवेक - प्रारंभ वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित प्रारंभ Translation - भाषांतर हरि : ॐ आतां नमन करूं जावें ॥ तव नम्य आदी भावावें ॥मगतयाशी वंदावें ॥ गुरु म्हणोनी ॥१॥परि हा शिष्टसंप्रदायु ॥ द्वैतीं झाला दीर्घायु ॥गुरुशिष्यांचा प्रत्ययु ॥ परंपरें ॥२॥अंधाचिया मालिका ॥ न सोडिती एकमेकां ॥दूषण ठेविती लोकां ॥ चक्षुष्मंतं ॥३॥आदि मनन करावें ॥ म्हणजे स्वरूपीं निश्चित होवावें ॥कल्पना कांहींच नुद्भवे ॥ मनोमयी ॥४॥तैसेचि मुनी विद्यारण्य ॥ बोलिले स्वमहिमान ॥वेदमातेचे कडिये बैसोन ॥ पंचदशी ॥५॥पंचविवेक पंचदीप ॥ तैसा आनंद ही पांचरूप ॥दाविली पंचदशरूप ॥ पंचदशी ॥६॥ऐसी ही नवयुवा सुंदरी ॥ वाग्विलासें नृत्यकरी ॥भाषा संस्कृताभीतरी ॥ गूढध्वनी ॥७॥तें सकळां नकळें ॥ म्हणोनी ओवियें गाइलें ॥प्राकृत जन भोळे ॥ तृप्त कराया ॥८॥नवल प्रेमाची आवडी ॥ स्वदेश भाषेची परम गोडी ॥संस्कृतेंही झालीं वेडीं ॥ वाग्विलासें ॥९॥कांहीं गुप्त ठेविल्या मनोगता ॥ उघद बोलियेले यथार्थता ॥म्हणोनीया हरिगीता ॥ नाम ठेवियेलें ॥१०॥भाषा शुद्ध मराठी ॥ परि अमृतही लाळ घोटी ॥ज्ञानिये टकमक द्दष्टी ॥ भांबावती ॥११॥ N/A References : N/A Last Updated : November 29, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP