तत्वविवेक - श्लोक २३ ते २६
वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.
बुद्धिकर्मेंद्रियप्राणपंचकैर्मनसा धिया ॥
शरीरं सप्तदशभि: सूक्ष्मतल्लिंगमुच्यते ॥२३॥
एवं कर्मेंद्रिया ज्ञानेंद्रिय प्राण ॥ हीं पंचकें त्रय एकवटून ॥
त्यांत बुद्धि मन मिळोन ॥ सतरा तत्वें ॥१०५॥
तया नाम लिग शरीर ॥ सतरा तत्वांचें बिढार ॥
सकल सुख दु:ख विचार ॥ येथची वसे ॥१०६॥
प्राज्ञस्तत्राभिमानेन तैजसत्वं प्रपद्यते ॥
हिरण्यगर्भतामीशस्तयोर्व्यष्टिसमष्टिता ॥२४॥
ययाचा धरुनी अभिमान ॥ तैजस नाम झाला प्राज्ञ ॥
ईश्वरा हिरण्य गर्भजाण ॥ बोलताती ॥१०७॥
व्याष्टि रूपाच्या अभिमाना ॥ तैजस बोलती जाणा ॥
समेष्टीच्या अभिमाना ॥ हिरण्यगर्भ ॥१०८॥
समष्टिरीश: सर्वेषां स्वात्मतादात्म्यवेदनात् ॥
तदभावात्ततोऽन्ये तु कथ्यंते व्यष्टिसंज्ञया ॥२५॥
सकळ लिंग शरिराचा ॥ धरितो जो अभिमान साचा ॥
तया समेष्टीपणाचा ॥ ईश्वर बोलती ॥१०९॥
तोचि हिरण्यगर्भ जाण ॥ इतर जीव सकलही सान ॥
एकेक व्यष्टी धरून ॥ राहटताती ॥११०॥
तद्भोगाय पुनर्भोग्यभोगायतनजन्मने ॥
पंचीकरोति भगवान् प्रत्येकं वियदादिकम् ॥२६॥
तया जीवाचे उपभोगासाठीं ॥ पुन्हां भोग्य करी जगजेठी ॥
भोगायतनाची अटाटी ॥ रचीतसे ॥१११॥
वियदादि पंच भूतातें ॥ पंचीपंच करूनी पांचांतें ॥
भगवान जाहले निर्मिते ॥ स्थूल देहा ॥११२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 29, 2014
TOP