तत्वविवेक - श्लोक ४९ ते ५२
वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.
सविकल्पस्य लक्ष्यत्वे लक्ष्यस्य स्यादवस्तुता ॥
निर्विकल्पस्य लक्ष्यत्वं न द्दष्टं नच संभवि ॥४९॥
शंक - महावाक्यें काय लक्षावें ॥ सविकल्प कीं निर्विकल्पावें ॥
परि हे दोन्हीही पक्ष आघवे ॥ व्यर्थ होती ॥१६२॥
सविकल्प म्हणावें जरी ॥ तरी ते अवस्तु निर्धारी ॥
मिथ्यापणेंचि उजरी ॥ येई पुढें ॥१६३॥
नाम जात्यादि रहित ॥ निर्विकल्प सदा असत ॥
तयासी कल्पावें हा व्याघात ॥ होऊं पहातो ॥१६४॥
लोकीं द्दष्ट झालेंची नाहीं ॥ जयाची उत्पत्तिही कोठें नाहीं ॥
तयाशी कल्पावें हें पाहीं ॥ मिथ्या बोल ॥१६५॥
विकल्पो निर्विकल्पस्य सविकल्पस्य वा भवेत ॥
आद्ये व्याहतिरन्यत्रानवस्थात्माश्रयादय: ॥५०॥
समाधान - तूं जो विकल्प करशी ॥ तो निर्विकल्पीं का सविकल्पाशी ॥
प्रथम व्याघात रूप तुजसी ॥ कळों आलें ॥१६६॥
द्वितियें सविकल्पीं विकल्प ॥ हेंही म्हणणें दिसें अल्प ॥
येती बहुता परि दोष ॥ आत्माश्रयादि ॥१६७॥
“विकल्पनेन सह सविकल्प:” ॥ येथ प्रथमचि असे विकल्प ॥
तया विकल्पावरी विकल्प ॥ कैसा करसी ॥१६८॥
येणें येणें प्रकारें ॥ दोष येतील सारे ॥
म्हणोनी विकल्पाचे वारे ॥ येवो न द्यावे ॥१६९॥
इदं गुणक्रियाजातिद्रव्यसंबंध वस्तुषु ॥
समं तेन स्वरूपस्य सर्वमेतदितीष्यताम् ॥५१॥
विकल्पतदभावाभ्यामसंसृष्टात्मवस्तुनि ॥
विकल्पितत्त्वलक्ष्यत्वसंबंधाद्यास्तु कल्पिता: ॥५२॥
गुणक्रिया जाती द्रव्य संबंध ॥ हें वस्तुशी कल्पणे अबद्ध ॥
वस्तु स्वत: असे सिद्ध ॥ जैशी तैशी ॥१७०॥
महावाक्यें हेंचि लक्षावें ॥ कीं वस्तु अस्पृक आहे स्वभावें ॥
गुणादिक हें भावावें ॥ कल्पनावरुती ॥१७१॥
तार्किकें करती शंका ॥ परि त्या मनी घेऊंनका ॥
श्रुति मातेच्या शब्दा वळखा ॥ घाला तुम्हीं ॥१७२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 29, 2014
TOP