तत्वविवेक - श्लोक ५७ ते ६०
वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.
वृत्तीनामनवृत्तिस्तु प्रयत्नात्प्रथमादपि ॥
अद्दष्टा सकृदभ्यास संस्कारसचिवाद्भवेत् ॥५७॥
यथा दीपो निवातस्थ इत्यादिभिरनेकधा ॥
भगवानिममेवार्थमर्जुनाय न्यरूपयत् ॥५८॥
शं० - असो समाधीकार वृत्ती ॥ पुन्हा उत्थित कैशी होती ॥
प्रयत्नाचा अभाव जये स्थिती ॥ निरंतर ॥१८०॥
स० - पूर्व कर्म रूप संत्कारें ॥ पुन: पुन: वृत्ती उभारे ॥
परि ती अभ्यासें न्यावी माधारे ॥ योगादिकीं ॥१८१॥
ऐसा निरंतर करितां अभ्यास ॥ न पडे उत्थानादिकांचा त्रास ॥
आत्मैक्य पदीं समाधी विलास ॥ भोगी सुखें ॥१८२॥
मग निर्वात जैसा दीप ॥ तैशी राहे आपे आप ॥
ऐसे बोलियला जगाचा बाप ॥ गीतेमाजी ॥१८३॥
हेंही नको अघवे ॥ स्वत: आपण अनुभवावें ॥
मग शंका कैशी उद्भवे ॥ तें पाहों आम्हीं ॥१८४॥
अनादाविह संसारे संचिता: कर्मकोटय: ॥
अनेन विलयं यांति शुद्धो धर्मों विवर्धते ॥५९॥
ऐशी होतां आत्मस्थिती ॥ सकल कर्में विलया जाती ॥
पुण्या पुण्य संचितादि जाती ॥ दग्ध होती ॥१८५॥
मग स्वधर्म वादूं लागे ॥ वृत्ती आनंदची झाली अंगें ॥
तें सुख कोण सांगे ॥ अवर्णनीय ॥१८६॥
धर्ममेघमिमं प्राहु: समाधिं योगवित्तमा: ॥
वर्षत्येष यतो धर्मामृतधारा: सहस्रश: ॥६०॥
तयाचे एके क्षणीं ॥ होते सहस्रश: क्रतुश्रेणी ॥
अमृतधारा वर्षोनी ॥ धर्म राणीवा देई ॥१८७॥
म्हणोनि धर्ममेघ तया प्रती ॥ स्पष्ट बोलिली वचनोक्ती ॥
योगवितमाची स्थिती ॥ ऐसी होय ॥१८८॥
तो जेउता पाहे ॥ तेथें ऋद्धि सिद्धी उभी राहे ॥
तो राहे ते ठाये ॥ कैलास भुवन ॥१८९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 29, 2014
TOP