तत्वविवेक - श्लोक ६५

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


इत्थं तत्त्वविवेकं विधाय विधिवन्मन: समाधाय ॥
विगलितसंसृतिबंध: प्राप्नोति परं पदं नरो नचिरात् ॥६५॥

ऐसा हा तत्व विवेक ॥ जे नरवाचिती बुद्धिपूर्वक ॥
तया संसाराचें दु:ख ॥ न शिवे कोणकाळीं ॥१९८॥
विचारकरुनी पहाती ॥ तया होय आत्मस्थिती ॥
अद्वैत साम्राज्य भोगिती ॥ निरंतर ॥१९९॥
सतगुरु कृपाबळें ॥ मी टाकूं गेलों पाउलें ॥
निर्बळचि परि बळ आलें ॥ तडियवरी ॥२००॥
बाळपणीं जडदेह मृदु ॥ पडितां सांवरीतसे गोविंदु ॥
बाप लागलासे छंदु ॥ कैसा नकळे ॥२०१॥
पोराचिये आवडी ॥ आपणही घाली पायघडी ॥
दोन्ही करांतें वोढी ॥ आपुलेकडे ॥२०२॥
करुनि माघारी द्दष्टी ॥ नवलचाली चाले उफराटी ॥
होतां न होतां शेवट मिठी ॥ घालुनी चुंबे ॥२०३॥
आत्मा वै पुत्रनामासि ॥ हें साच करावया श्रुतीशीं ॥
खेळे आप आपणाशीं ॥ कांहीही मिर्षे ॥२०४॥
ऐसें हें स्वप्नीय खेळ ॥ मज प्रबोधीं आठवलें प्रांजळ ॥
तरी स्वात्मान्य विटाळ ॥ शिवूं न शके ॥२०५॥

इतिश्री हरिगीते हरिहरराय विरचिते तत्त्वविवेकं नाम प्रथम प्रकरणं समाप्तमस्तु - ॐ तत् सत् ॥
॥ शांति: शांति: शांति: ॥

समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP