तत्वविवेक - श्लोक १२ ते १४

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


अध्येतृवर्गमध्यस्थपुत्राध्ययनशब्दवत् ॥
भानेप्यभानं भानस्य प्रतिबंधेन युज्यते ॥१२॥
प्रतिबंधोऽस्ति भातीति व्यवहाराईवस्तुनि ॥
तन्निरस्य विरुद्धस्य तस्योत्पादनमुच्यते ॥१३॥
तस्य हेतु: समानाभिहार: पुत्रध्वनिश्रुतौ ॥
इहाऽनादिरविद्यैव व्यामोहैकनिबंधनम् ॥१४॥

गुरुगृहीं अध्ययन ॥ स्वपुत्र करितसे जाण ॥
परि तयाचें नसे यथार्थ ज्ञान ॥ बाहेरुनी ॥७८॥
वर्गसमूह पठण करी ॥ तेथ स्वपुत्र ही उच्चारी ॥
परि तयाचा शद्ध निर्धारी ॥ हें न घडे ॥७९॥
भानें अभान झालें ॥ अभानीं भान उद्भवलें ॥
स्वपुत्र शद्ब ओळखिले ॥ आनंदानें ॥८०॥
म्हणोनी सामान्य भान ॥ विशेष अभान ॥
या दोहींस ही कारण ॥ प्रीतबंध असे ॥८१॥
सकल ही वस्तुसी ॥ प्रतिबंध असे विरुद्धेसी ॥
जैसे अस्ति भाति इयाशी ॥ नास्ति न भाति ॥८२॥
प्रतिबंधाचा निरास ॥ तोचि जन्म म्हणती त्यास ॥
व्यवहारी सकळही वस्तुस ॥ जनन प्रतिबंध ॥८३॥
जैसें स्वपुत्र शब्द ओळख ॥ वर्गसमूह हो प्रतिबंधक ॥
तैसेहि अविद्या व्यामोह देखा ॥ येथ प्रतिबंध ॥८४॥
व्यामोह म्हणजे विपरीत ज्ञान ॥ हेंचि बंधा मुख्य कारणा ॥
तेंचि अनादी अविद्या लक्षण ॥ ऐका पुढती ॥८५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP