तत्वविवेक - श्लोक ३४ ते ३६

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


स्यात्पंचीकृतभूतोत्थो देह: स्थूलोऽन्नसंज्ञक: ॥
लिंगे तु राजसै: प्राणै: प्राण: कर्मेद्रियै: सह ॥३४॥
सात्विकैर्धींद्रियै: साकं विमर्शात्मा मनोमय: ॥
तैरेवसाकं विज्ञानमयो धीर्निंश्चयात्मिका ॥३५॥
करणे सत्वमानंदमयो मोदादिवृत्तिभि: ॥
तत्तत्कोशैस्तु तादात्म्यादात्मा तत्तन्मयो भवेत् ॥३६॥

कोश म्हणजे आवरण ॥ स्वस्वरूप विस्मरण ॥
तेणें झालें भ्रमण ॥ भुवन त्रयीं ॥१३७॥
स्थूलदेह तोचि अन्नमय ॥ अन्नीं निर्माण अन्नीं लय ॥
तयाशींच करुनी आत्मीय ॥ जीववर्ते ॥१३७॥
पंच कर्मेंद्रियें पंच प्राण ॥ मिळोन प्राणमय कोश जाण ॥
हाचि मी ऐसें म्हणोन ॥ कर्में करी ॥१३९॥
पंच ज्ञानेंद्रियें मनबुद्धि ॥ येही मनोविज्ञानमय कोश सिद्धी ॥
तियेठाईं ठेउनी बुद्धि ॥ हेंचि मी म्हणे ॥१४०॥
ऐसे त्रयकोशाचेयुत ॥ लिंग देहीं असे वर्तत ॥
तेचि मी म्हणोनी रत ॥ झाला जीव ॥१४१॥
सुषुप्ति आनंद विभासे ॥ तेंचि मी ऐसें भासे ॥
तोचि आनंदमय कोश असे ॥ स्वात्मरूपीं ॥१४२॥
येणें येणें प्रकारें ॥ आत्मा तन्मयत्व स्फुरे ॥
कोश नामाभिधानें धरे ॥ आपुल्याला ॥१४३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP