तत्वविवेक - श्लोक ४३ ते ४८

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


परापरात्मनोरेवं युक्त्या संभावितैकता ॥
तत्त्वमस्यादिवाक्यै: सा भागत्यागेन लक्ष्यते ॥४३॥

तेंचि करावया विवरणा ॥ भाग त्याग लक्षण ॥
तत्वमस्यादि वाक्यें करुन ॥ करूं पुढें ॥१५२॥
एवं उक्त प्रकार करून ॥ जीवात्मा न होऊनि भिन्न ॥
युक्त्या साम्य लक्षण ॥ प्रदर्शिलें ॥१५३॥

जगतो यदुपादानं मायामादाय तामसीम् ॥
निमित्तं शुद्धसत्वां तामुच्यते ब्रम्हा तद्निरा ॥४४॥
यदा मलिनसत्त्वां तां कामकर्मादिदॄषिताम् ॥
आदत्ते तत्परं ब्रम्हा त्वंपदेन तदोच्यते ॥४५॥
त्रितयीमपि तां मुक्त्वा परस्परविरोधिनीम् ॥
अखंडं सच्चिदानंदं महावाक्येन लक्ष्यते ॥४६॥

यतजे सच्चिदानंद लक्षण ब्रम्हा ॥ तेंची तामसी स्वीकारी मायाधर्म ॥
उपाधीयोगें गुण कर्म ॥ करी ऐसें वाटे ॥१५४॥
शुद्ध सत्वप्रधान ॥  मायानिर्मीतां झाले जाण ॥
तया निमित्त उपादान ॥ तत् ऐसें बोल ती ॥१५५॥
मलीन तत्त्वीं मायेंत ॥ जें प्रतिबिंबत होत ॥
तया त्वं ऐसे उच्चारित ॥ ब्रम्हातद्निरा ॥१५६॥
एवं त्रय प्रकारीं ॥ एकची वसे निर्विकारी ॥
माया त्यागूनी निर्धारी ॥ हेंचि लक्षावें ॥१५७॥
“तत्वमसी” महावाक्यें ॥ जीव ब्रम्हा आलें ऐक्यें ॥
मायादि उपाधी पडले फिक्के ॥ वेदोपदेशें ॥१५८॥

सोऽयमित्यादिवाक्येषु विरोधात्तदिदंतयो: ॥
त्यागेन भागयोरेक आश्रयो लक्ष्यते यथा ॥४७॥
मायाविद्ये विहायैवमुपाधी परजीवयो: ॥
अखंडं सच्चिदानदं परं ब्रम्हौव लक्ष्यते ॥४८॥

होहो तोचि मी देवदत्त ॥ येणें विरुद्ध धर्म त्याग होत ॥
अन्य देश काळ लक्षण न स्मरत ॥ त्याचेची स्मरे ॥१५९॥
तैसाचि मायोपाधी गत ॥ जीव ब्रम्हाता जैं स्मरत ॥
तैं अखंड भेद रहित ॥ ब्रम्हाची असे ॥१६०॥
ऐसें भागत्याग लक्षणें ॥ माया ब्रम्हा ओळखणें ॥
आप आपणातें जाणणें ॥ महावाक्यें ॥१६१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP