प्रसंग पांचवा - अपिवत्र-निखंदन

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


स्‍वजठरीं जंत कृमींचा उबाळा । रवरव भोगितां न ये कांटाळा । वर्दळें आंघोळी करी वेळोवेळां । असत्‍य असत्‍यासंगें ॥१८॥
अमंगळीं अनेक जीव उद्भवती । सुगंध दावू जातां अधिक बुडती । तैसे साधु सांडूनि अपवित्रां भजती । परद्वार विषयांस ॥१९॥
उत्तम यातीचा ब्राह्मण आचार्य । विधिपूर्वक आंघोळी नाक धरी । शूद्रीसी रमोनि दासी पुत्र कुमरी । म्‍हणवितसे ॥२०॥
शरीर आचारें सोंवळेपणें मोडें । शुद्रीचे उदरी दासीवेल वाढे । तैसे नाना भवबंध खोडे । विप्र सोसिती उन्मत्तें ॥२१॥
इकडक म्‍हणवी कृष्‍णजी जाणावा । तिकडे म्‍हणवी मेसावी ना सटवा । परी लाज न धरीच गा सदाशिवा । मूळ वंशाची शुचित्‍वें ॥२२॥
विप्र स्‍वयें देहीं म्‍हणे काशी लक्ष्मी । शूद्रीचे कुसीं म्‍हणवी लुमी गोमी । नाना मतें शास्त्रें पढोनि अधर्मी । व्युत्‍पत्ति दावितसे ॥२३॥
जो होईल स्‍वयें श्रीमुखें सती । आणिक अकरा इंद्रियांचा जती । तो सत्‍यार्थ या त्रैलोक्‍याचा सारथी । सुफल जिणें त्‍याचें ॥२४॥
पवित्र जेथे जाय तेथें पवित्र । अपवित्र जेथें तेथें फटमर । मनुष्‍य जन्मा येऊनि भोगी अघोर । दुष्‍ट पतितपणें ॥२५॥
चंदन वनांतरीं असे चंदनपणें । करवतल्‍या न सांडी धृतीनें । पवित्रांनीं चर्चिल्‍या पवित्रपणें । देवासहित मस्‍तकीं ॥२६॥
ऐसे पवित्र स्‍तविले सद्‌गुरूनें । अपवित्रातें केलें पहा निखंदनें । प्रतिवचन शेख महंमदानें । दिधलें तें परियेसा ॥२७॥
शेख महंमद म्‍हणे जी सद्‌गुरु । तुम्‍ही पतितांसी दूषिलें जाहिरू । चांडाळ निवडिले त्‍यांचा अंगिकारु । कवणें करावा स्‍वामी ॥२८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP