मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग पांचवा| दुराचार्यांचाहि उद्धार प्रसंग पांचवा गुरूच्या सहाय्याची आवश्यकता सच्छिष्याची वाण अपिवत्र-निखंदन उद्धरणाची आवश्यकता दुराचार्यांचाहि उद्धार उद्बोध व्यक्तिगत दुकाळे साधु गोसावी मूढ दोषी सद्गुरु कोण फकीर कोण खरा संन्यासी जोगी कोण खरा जंगम अय्या महात्मा कोण ब्राह्मण कोण खरा बैरागी शेवडा घरबारी कोण मिथ्या वाद ईश्र्वर कीर्ति प्रसंग समाप्ति प्रसंग पांचवा - दुराचार्यांचाहि उद्धार श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत सदगुरु सामर्थे पातकी दुराचार्यांचाहि उद्धार Translation - भाषांतर सिकलकाराचें सामर्थ्य परियेसा । तदाकार केला मळका आरसा । भीतरी दिसती दाही दिशा । आकाश मही देखील ॥३८॥सद्गुरु म्हणती तूं आत्मज्ञानें शोधी । मळका आरसा याती पोलादी । तरी शिकलकारें दाविली बुनादी । साक्षी त्याची परिसोनी ॥३९॥रांजणाचे कांठमोरे महा थोर । उजळ करूं जातां शिकलकार । तंव काळकूट निघतसे अपार । तैसी अशिष्यीं ऐहिक्यता ॥४०॥शेख महंमद द्रवे शूरत्वपणें । ऐका जी सद्गुरु तोतरी वचनें । तुमचे कृपें तुम्हांसी अनुवादणें । मज लडिवाळणें ॥४१॥पहा नारळ वरी कठीणपणें । भीतरी रीघ केला असे जीवनें । तैसे तुम्हीं आपुल्या सामर्थ्यपणें । पाषाण हृदयीं संचरावें ॥४२॥पहा सामर्थ्ये विज कडाडूनि । जेथें पडे तेथें शीघ्र लावी पाणी । पाषाण फोडोनि करी दाणादाणी । महा बळात्कारें ॥४३॥पहा जळा जिरालें असें फिरंगीस । जगीं जळपणें मिरवी उदास । जेथे घाली तेथें करी रास । मोल पाणीपणें ॥४४॥आतां बरा शब्दीं गवसलास । सद्गुरु म्हणजे शेख महंमदास । गरूत्वीं करी शिष्यत्वें प्रकाश । सगुणतव हेरीनें ॥४५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP