प्रसंग पांचवा - उद्धरणाची आवश्यकता

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


मलीन जालें तें उदकें शुचावें । उदकें दविडल्‍या कोठें जावें । तैसे तुम्‍ही जेव्हां चांडाळ म्‍हणावें । तेव्हां उद्धरिता कवण ॥२९॥
दुष्‍ट पातकी नष्‍ट चांडाळ भला । तरी सद्‌गुरु पावनालागी पावला । नाहीं तरी कोण वैकुंठ मुक्तीला । तुम्‍हांसहि पुसते ॥३०॥
स्‍वयें सारिखेच असते त्रिभुवन । कोण नेणती पापपुण्यालागुन । यालागी स्‍वामी सद्‌गुरूचें वंदन । रामकृष्‍णें केलें असें ॥३१॥
स्‍वामी ठायींचेच असती सगुण । तरी कवण वंदी तुम्‍हांलागुन । तुमचे कृपादृष्‍टीनें अवगुण । पळोन जातील ॥३२॥
पहा पहा ते किटकीस प्रयत्‍नें । आपल्‍यासारिखें केले भृंगीनें । तैसें तुमचे ठायीं काय असे उणें । सत्‌  सामर्थ्यालागी ॥३३॥
तंव सद्‌गुरु म्‍हणती ऐहिक्‍य कीर्ति । ते कीटकीचे ठायीं होती हेतु प्रीती । तरीच ते भृंगी जाली उडती । एका अनुसंधानें ॥३४॥
पहा तिळाचें ठायीं होता गौलता । तरीच पुष्‍पांचा गंध लागला तत्त्वतां । तात्‍काळ पालटोनि स्‍वहिता । मोगरेल जालें असे ॥३५॥
पहा एरंडी भरली असे तैलें । तीस काय करितील मोगर्‍याची फुलें । ऐसें जे संचितानें सांडवलें । त्‍यासी प्रयत्‍न नाहीं ॥३६॥
शेख महंमद सद्‌गुरूसी विनविता । तुम्‍ही जेव्हां प्रयत्‍न नाहीं ऐसें म्‍हणतां । तेव्हां बुडाली ईश्र्वराची सत्ता । निमिष न लागतां ॥३७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP