प्रसंग पांचवा - ईश्र्वर कीर्ति

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


साही दश्रनामध्यें सद्‌गुरु असे । परी त्‍याची कृपा कोणी एकास प्रकाशे । येर घेताती द्वैत प्रपंचाचें झांसे । उदंड व्यर्थ मेले ॥१०८॥
ज्‍यासी ईश्र्वराचें ज्ञान होईल । त्‍यासी ईश्र्वर सत्‍य भासेल । येर उदंड करितील बोल । आपुलाले मार्गें ॥१०९॥
बाहेर उदंड झुंझले झुंझती । त्‍यांचे पवाडे कीर्ति केल्‍या करिती । परी त्‍या मजला नैश्र्वर्य वाटती । ईश्र्वर कीर्तिविण ॥११०॥
स्‍वयें अंतरी झुंजल्‍याची कीर्ति । कोठें ऐकिली देखिली नव्हती। हें मज अनसुट संगें गवसली पुरती। स्‍वयें किर्तोन कीर्ति कीर्ताव्या ॥१११॥
एकाच्या एका आसर्‍याने कथन । उदंडाचें केलें करिती कविजन । आपुल्‍या पुढिलांच्या स्‍वहितालागून । विरळा कोणी कथिती ॥११२॥
गतल्‍यास वंचिती कन्या कुमर । त्‍यामागें केला शेकाकार । म्‍हणोनि कवित्‍वीं कवीश्र्वर । शोक केल करिती ॥११३॥
ईश्र्वरकीर्ति अनुभवप्रचीति । भाव भक्ति वैराग्‍य सोऽहं स्‍थिती । येणें प्रकारें जें कवित्‍वीं अनुसरती । ते साधु ईश्र्वरत्‍वें ॥११४॥
प्रसंग पाचवा समाप्त जाहला ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP