प्रसंग पांचवा - मिथ्‍या वाद

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


यवनांचा आचार्य मुल्‍ला काजी । सकळ अधर्मांसी द्यावी बाजी । गोत्रांस करावें भक्तीस राजी । तो आचार्य खरा ॥९९॥
चौदा पंथांचा आचार्य सोफी खरा । आपल्‍याच मार्गास म्‍हणवी बरा । अणिकातें निखंदूनि करी तोरा । त्‍याचें ज्ञान मिथ्‍या असें ॥१००॥
दशनामाचा आचार्य संन्यासी । तो पवित्र म्‍हणवी आपुलया मार्गासी । निखंदूनि बोलतसे आणिकांसी । कृत्रिम ज्ञातेपणें ॥१०१॥
बारा पंथ आचार्य जोगी तोले । आणिकां आचार्या हितोपूनि बोले । ईश्र्वर प्रवृत्ति नाहीं मिळाले । अपुरते म्‍हणोनियां ॥१०२॥
जंगम स्‍वयें पांच पंथी म्‍हणवी । आपण गुंतला अणिकांतें गोंवी । ईश्र्वरासारिखा होय अनुभवी । प्रबळ ज्ञातेपणें ॥१०३॥
शूद्र वर्णाचा ब्राह्मण गुरु जाणा । सर्वत्र अशुच म्‍हणवी शाहाणा । सर्वत्रीं सम नेणें ब्रह्मत्त्वाच्या खुणा । पुरते ईश्र्वरत्‍वपणें ॥१०४॥
बैरागी शेवडे महात्‍म्‍ये मित्रपणें । निखंदतील साही दर्शने । परी आपणांस कोणी न म्‍हणवी उणें । अहंकारासंगे मातले ॥१०५॥
ऐशा या आचार्यांच्या खटपटा । परतोनि जुंझेल तो इतुक्‍यांचा द्रष्‍टा । अहंकार वधुनी होय गोमटा । स्‍वयें ईश्र्वर जैसा ॥१०६॥
ईश्र्वरें सर्वदां एक देखिलें । आचार्यें पहा द्वैत भावितां वंचले । परी मिश्रित होऊनि नाहीं निवाले । सद्‌गुरु चंदन जैसा ॥१०७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP