प्रसंग पांचवा - खरा बैरागी शेवडा घरबारी कोण
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
बैरागी शेवडा सांगेन खरा । वर वेष गळित लुंचित अंतरा । महाकारण गोदडीनें दिसे साजिरा । तो चुके स्थूळ संसारासी ॥९५॥
जाणें तो आत्मा समत्वें राम । बारासोळांसी घे त्रिकुटी विश्राम । नित्य निज नेमीं जाहीर मुकाम । बैरागी शेवडा ऐसा ॥९६॥
घरबारी तो जाणे शून्य घर । पांचा तत्त्वांचा न धरी आधार । निरसोनी पाहे मायाकार । अविकल्प धरूनियां ॥९७॥
या स्थूळ देहें धर्म शुचित आचरे । द्वैत तोडूनि थारे । यकळ विषयांचे चुकची मारे । त्या नांव घरबारी राणा ॥९८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP