गुरुस्तुति

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.
N/A

( गीतिवृत्त )

श्रीगुरुचरणस्मरनस्तवननमन भद्र सर्वदा साचें.
श्रीगुरुगुनकीर्तन जें, तेंचि तपज्ञान सर्व दासाचें. ॥१॥
श्रीगुरुच्या उछिष्टें होय विमळ, जेंवि आशय ज्ञानें.
तुटतो गुरूपदेशें जैसा, तैसा न पाश यज्ञानें. ॥२॥
गुरुनें जीव शिवचे, बहु बरवी प्रकटूनि हातवटि केला.
वृद्ध तरुण शांतनुनें न पसरवुनि, जेंवि हात वटिकेला. ॥३॥
गुरुराज जनक, जननी, बंधु सुहृन्मित्र, सोयरे, स्वजन.
भजन श्रीगुरुचें तें गंगावाराणसीगयाव्रजन. ॥४॥
संसारात श्रीगुरु परम हित, न अन्य सोयरा जीव.
शिष्यातें मधुप करी, आपण सुरसाढ्य होय राजीव. ॥५॥
सर्वस्व श्रीगुरुला अर्पुनि उत्तीर्ण शिष्य होय न तें
कृत्य स्मरुनि, वहावें परिचरणीं देह, जेंवि तोय नतें. ॥६॥
मुख्य प्रसाद गुरुचा होतां, हरिचाहि बहुत बा ! होतो.
इछावें कृत्य करिन मी प्रथम मजचि दहांत बाहो तो. ॥७॥
जरि गुरु वळे, हरिहरहि, बहुकाळ नको यशास तरि होया.
वश कर्णधार होतां, लागे म्हणणें कशास तरि ‘ हो ! या. ’ ॥८॥
ब्रह्माविष्णुमहेश्वर साक्षात् श्रुतिगीतमहिम गुरु ज्यांस,
ते अन्य संसृतीसहि उन्मूळिति, जेंवि अहिमगु रुजांस. ॥९॥
गुरु बंध, गुरु परिग्रह, गुरु पुत्रहि, गुरु तसाचि वाटावा.
दाटावा तद्विरहें कंठ, मग न कां भवाब्धि आटावा ? ॥१०॥

उपसंहार
( गीतिवृत्त )

गुरुभक्ताच्या कार्या याव्या, म्हणऊनि या दहा आर्या
भक्तामयूरें धार्या लिहिल्या; रुचतिल न कां जना आर्या ? ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP