यज्ञपात्राकृतय: तत्परिमाणंच
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
१ - चरुस्थाली - इयं ताम्रमयी मार्तिकी वा अष्टांगुला द्वादशांगुला बा संकुचितानना ( ही तांब्याची किंवा मृत्तिकेची ८ किंवा १२ अंगुले उंचीची असून लहान तोंडाची असावी. )
२ - प्रोक्षणी - इयं स्त्रुगाकारा वारणवृक्षजा विस्तारार्धनिम्ना ( ही स्त्रुचेच्या आकाराची शिसव्याची अगर टेंभूर्णीच्या वृक्षाची आठ अंगुले लांब व्ब ४ अंगुले खोल असावी. )
३ - दर्वी स्त्रुक् - इयं पालाशी द्वादशांगुला. ( ही पळसाची, खैराची किंवा उंबराची १३ अंगुले लांब व ६॥ अंगुले खोल असावी. )
४ - स्त्रुव: - अय्म खादिरो वितस्तिंप्रमाणोर्धांगुलछिद्र: ( हा खैराचा १२ अंगुले लांब व अर्धा अंगुल खोल असून बूड १ अंगुळ व तोंड वोटोळे असा असावा. )
५ - प्रणीता - अयं पैप्पल: षडंगुलश्चतुरंगुलदंड: ( हा पिंपळाचा ६ अंगुले औरस चौरस तोंडाचा असून दांडा ४ अंगुले असावा. )
६ - आज्यपात्र - इदं कांस्यजं - मृण्मयं वा षडंगुलं. ( हें कांशाचे अथवा मृत्तिकेचे असून ६ अंगुले विस्तृत असावे ).
७ - इध्म - इदं पंचदशज्ञियसमिक्तं प्रादेशमितं ( टीचभर लांबीच्या यज्ञिय वृक्षाच्या १५ समिधा. )
८ - बर्हि: - इदं प्रादेशमात्र - मुष्टिपरिभित - दर्भरूपं. ( टीचभर लांबीचे एक मूठभर दर्भ. )
९ - शूर्पं - इदं वंशनिर्मितं ( हे वेळूचे असावे. )
१० - कृष्णाजिनम् - इदं पुंरुप हरिणस्य चर्म ( काळविटाचे चर्म. )
११ - उलूखलम् - इदं पालाश दारुकृतं ( हे पळसाच्या लाकडाचे असावे. )
१२ - मुसलम् - इदं खादिरं ( हे खौराच्या लाकडाचे असावे. )
१३ - मेक्षणम् - इदं यज्ञियदारुजं ( हे कोणत्याही यज्ञिय वृक्षाचे असून याचा उपयोग चरु होमाकडे करावा. )
१४ - इयं पाषाणमयी ( दगडाचा पाटा. )
१५ - उपल: - अयं पाषाण: पेषणसाधनम् ( वरवंटा दगडी. )
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP