श्लोकपंचक
रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला.
जाणोनि जो स्वप्न विभाविताहे, । जागोनि निद्रासुख सांगताहे, ॥
जागोनियां जागतयासि पाहे, । जाणे तया ग्रासुनि तेंचि आहे. ॥१॥
जाणे तयातें सहसा न जाणे, । तेणें तया लागुनि तो न जाणे. ॥
जाणे न जाणे द्वयही न जाणे । मी जाणणें निश्चित वात आणे. ॥२॥
व्यामोह आला कवणा न भासे, । कीं बोध झाला कवणा न भासे. ॥
बोले असें कोण कदा न भासे । बोले न बोले तरि दीर्घ हांसे. ॥३॥
भवी तयालागुनि लाज नाहीं. । स्ववी तया लागुनि लाज नाहीं. ॥
खोळी गमी त्याप्रति लाज नाहीं । बोली नसे त्याविण काज काई ॥४॥
जें बोलिजे त्याहुनियां निराळें । तैं आकळे निश्चित कोण काळें ? ॥
स्वप्रत्यया प्रत्यय तैं असेना । रंगासि तो रंग दुजा दिसेना. ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP