श्रीमन्नागेशाचें पद

श्रीसमर्थ रामदास वैष्णव सद्गुरु श्रीकृष्ण जगन्नाथ चरणारविंदेभ्यो नमः ।


नागेश उमानाथा । जय सदय नागनाथा । मज तारिं प्रभो आतां । शिवशंभोशंकर बहुसुख नाम तुझें गातां ॥धृ०॥
भव ताप दुःख नुरवी, निज लाभ पुरवी । चंचल हें मानस चिन्मय भक्तिसुखी मुरवीं ॥नागेश०॥१॥
करिं सकल विघ्ननाशा, हरिं विषय सेवनाशा । मी माझें गृह धन सुत या तोडिं मोहपाशा ॥नागेश०॥२॥
तव कंठिं रुंडमाळा, पाहतां कंप काळा । चिद्गंगा शोभतसे मस्तकिं त्रिजगपाळा ॥नागेश०॥३॥
नर जन्म मला दिधला, परि ओळखिलें न तुला । नाहिं तुझ्या प्रेमरसें हा अंतरंग भिजला ॥नागेश०॥४॥
साष्टांग नमन चरणीं, अघटीत तुझी करणी । अनुभव हा कृष्णसुताला पावसि तूं स्मरणीं ॥नागेश०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP