श्रीमदनंताची आरती
श्रीसमर्थ रामदास वैष्णव सद्गुरु श्रीकृष्ण जगन्नाथ चरणारविंदेभ्यो नमः ।
श्रीमदनंताची आरती.
श्रीमदनंत न अंत जया तो संत कृपे प्रघटला हो ॥धृ०॥
आसनिं शोभे त्रिभुवन नायक, भक्तजनाला निजसुख दायक । ओंवाळा आरती तयाला । सुयोग हा लाभला हो ॥श्री०॥१॥
बहु जन्मार्जित पुण्यें फळली, देहभावना विस्मृति पळली । गळली अहंकृति मिळलि आह्मांला अद्वय चिन्मय कला हो ॥श्री०॥२॥
करा भजन जय रामकृष्ण हरि, निश्चय प्रेमा धरुनि अंतरिं । पायीं घागर्या हातिं चिपळ्या नाचत नाचत चला हो ॥श्री०॥३॥
मनीं धरुनि सद्गुरु चरणांबुज, विनवी कर जोडुनि कृष्णात्मज । चला शरण श्री रमारमणपदीं सुदिन अजिचा भला हो ॥श्री०॥४॥
------------------------------------
गजर १ ला
शिवपार्वती तनयाला । प्रेमें करूं नमनाला । संरक्षि निज भजकांला । निवटूनियां असुरांला ॥चाल॥ मरण जनन हर पद ज्याचें । भजन रजनि दिन करुं त्यांचें ॥पूर्वचाल॥ हृदयीं स्मरुनि सदयाला । गाऊं धरुनि विनयाला ॥१॥
गजर २ रा
चला चला चला श्रीराम दर्शना चला । भला भला सुयोग हा आह्मांसि लाभला ॥ श्रीराम राम राम राम राम हरि वदा । दुरित सकल हरुनी दाविल आपुल्या पदा ॥१॥
गजर ३ रा
जाऊं चला पाहूं नयनिं सीताधवा श्रीराघवा ॥धृ०॥
भावभास परिहारी निजदास जन तारी । गाऊं तयाचें नाम वदनीं काम पुरवी आघवा ॥१॥
गजर ४ था
त्या प्रेमें श्रीहरिला, हृदयिं धरिला । निज जनन मरण हरण्यासि सदा ज्या भक्तजनीं वरिला ॥चाल॥ चक्रानें नक्रा चिरिला । सोडविलें संकटिं करिला । निजपद देउनि उद्धरिला ॥पूर्वचाल॥ भवभास सर्व हरिला । दासीं स्मरिला ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP