श्री रवळनाथाचें पद

श्रीसमर्थ रामदास वैष्णव सद्गुरु श्रीकृष्ण जगन्नाथ चरणारविंदेभ्यो नमः ।


श्रीरवळनाथाच्या चरणीं माथा, ठेवितो तुझा दास पहा ॥ बहुत त्रास मजु देति पहा हे काम क्रोधादीक साहा ॥धृ०॥
वारुनियां ते कृपादृष्टीनें, करुनी ठेवीं तव चरणीं । कष्ट नसे तुज स्पष्ट सांगतों, न कळे देवा तुझी करणी ॥श्रीरव०॥१॥
झडकरिं येसी धांवुनि तूं प्रभु, भक्तांसी संकट पडतां । संसृति पारावारीं बुडतों, तुजविण नाहीं मज त्राता ॥श्रीरव०॥२॥
नाना अवतारांतें घेउनि, भक्तांसी तूं रक्षितसे । कृष्ण सुत म्हणे अतिप्रेमानें, मन्मुक्ति त्वत्पदीं जाण असे ॥श्रीरवनाथा०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP