श्रीबजरंगबलीचें पद
श्रीसमर्थ रामदास वैष्णव सद्गुरु श्रीकृष्ण जगन्नाथ चरणारविंदेभ्यो नमः ।
बलभीमा भजनिं प्रेमा दे करुणाघना ॥धृ०॥
करीं दुरित भंगा । लाविं संत संगा । बजरंगा या मना ॥ब०देक०॥१॥
आत्मकृपा व्हावी । कीर्ति तुझी गावी । पुरवीं हे कामना ॥ब०देक०॥२॥
कृष्णतनय याची । विषय बंधनाची । नुरवावी वासना ॥ब०देक०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP