श्रीग्रामदेवी श्रीषष्टी शांतादुर्गेचें पद
श्रीसमर्थ रामदास वैष्णव सद्गुरु श्रीकृष्ण जगन्नाथ चरणारविंदेभ्यो नमः ।
देवि जननि असुर हननि पदरिं घे मला ॥धृ०॥
हरुनि मन मला, शरण पदतला ॥देवि०॥ करुनि दया या समया सुपथ दाविला । दिवस हा भला, मजसि लाभला ॥दे०॥१॥
मरण जनन हरण तुझ्या चरणिं लागला । स्वसुख जोडिला, बंध तोडिला ॥दे०॥२॥
अशुभ नुरवि सुजन उरवि, पुरविं हेतुला । लाज हे तुला, संतसेतुला ॥दे०॥३॥
कृष्णनयन धरुनि विनय नमन करि जिला । ग्राम देविला, सुमन सेविला ॥दे०॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP