उर्दु रिवायत
संकीर्ण वाड्मय साहित्य.
आया म्होरम का महिना ॥ घरमे नही घिउंका दाना ॥ चौंगे रोटा कायसि करना ॥ आंबिल खटि कायकी थाना ॥१॥
आलावा आम्ही क्योंकर खेलना ॥ गरानर घेर्या आति हमना ॥ आना यो हालकू किंहू करना ॥ आया म्होरम कैसा हामना ॥२॥
पाणि तोबि कित्ता पिना ॥ पानिसे दम किहु निकलना ॥ गया भुकको सारा सिना ॥ रिवायत तोबि किहु पडुना ॥३॥
आतां है जोशका ऊबाल ॥ भरता है खुष हाल ॥ जोर नहि सो किम कुदना ॥ सबब आता ह्यो खुब शेना ॥४॥
सदागम बाबासाहेब करना ॥ नहि गम उनका भुलजाना ॥ सबरका काम आहे आपना ॥ मिलेगा आजर नहि डरना ॥५॥
हें उर्दू म्हणजे एकप्रकारें मराठीच आहे म्हणाना. अस्सल उर्दूचे मानानें ही बोली अगदींच गांवढळ बोली होय. यांत दारिद्र्यामुळें मोहरमचा सण करणें कसें जिवावर आलें आहे याचें करुणास्पद वर्णन आहे.
प्रस्तुत बाडामध्यें ज्या मुसलमान कवींची कविता आली आहे त्यांची यादी त्यांच्याच उल्लेखासह देऊन निबंध समाप्त करूं.
(१) आबदूल
आबदूल म्हणे राज्यभास्कराला ॥
दारुद सलाम बिसमिल्ला ॥
(२) गरीब आबदूल
गरीब आबदूल असे म्हणी ॥ घ्यावे गुरुपत्र समजोनी ॥
(३) बाबन
आरुली लढाई हासेनाची कळलि हो सार्या लोकाला ॥ कळलि हो सार्या लोकाला ॥ गरिब बाबनाला ॥ शाहिर नाहि आला मौला आलिचा हुसेन बोले यजिद सैन्याला ॥
(४) महंमद हानिफ
“ महहंमद हानिफ आकबर आलि लाऊन तुरा ”
(५) आबालाल
हो नम्र आबालाल पुरे करितो येथुनि ॥ येते उरु भरुनि असे दुष्ट कल्पना ॥...
(६) दारा
हाय हाय बोला, माझ्या सखयाला, कारिब दारा म्हणे रामराम सभेला ॥
(७) फतिशा
‘ फतिशानें शोक किया ’ इत्यादि हिंदी पद्य.
(८) बाबासाहेब
बाबासाहेब करना नहि गम उनका० इत्यादि उर्दू मराठी पद्य.
(९) शेख मिराजी
सलाम करितो सर्व्या जना । शेख मिराजी हेळ्या मतना ॥
ऐ. सं. वाङ्. स.अ खं. १-३
(१०) जोव्हारशा
म्हणे जोव्हारशा कुठें वरि ॥ शब्द आतां पुरे करि ॥ ऐकुन घ्या तरि तुम्ही पारी ॥ झाला शाईर घरोघरि ॥
(११) राजा बापू
राजे बापू तो कवि म्हणे । दातानें लोहचणें खाणें ॥
(१२) नबी महंमद
नबी महंमद म्हणी एकविद होउनि सदा स्मरावे रामराम ॥ किये मुनत आदा है शुरु सलाम ॥
(१३) शेख महंमद
शेख महमद शर्णि आला ॥ हात जोडुन सभेला ॥ बडे पिर खादिर साहेबाला ॥ नमस्कार करून येऊं त्याला ॥
(१४) सुलतान
सुलतान सांगे देवाला कर दोन जोडुनी ॥ कर दोनी जोडुनी ॥ मुळा पासुनी तुमच्या मनीं ॥
(१५) महमद नबी
महमद नबी पडो दारोदारा । कहो मोजि पेला नथहार बारा ॥
(१६) दादा आतार
दादा आतार लाऊन तुरा । कवि केला आप्रमपुरा । प्रसन है खाजा हैदरा । असा बुद्धिचा आहे चातुरा ॥
(१७) करीम
बल खिजमंत होरा कदमला । गरिब करिम गमसे दिलको जला ॥ ( हिंदी )
(१८) कासम
कासम म्हनि काकासि विद्या तुम्ही पुरी करा ॥ मातिचा शोक होईल मागें फिरा ॥
प्रस्तुत बाडांत एकंदरींत ८६ रिवायती आहेत. सर्व रिवायतीच्या मिळून अंदाजे १६०० ओळी आहेत व त्यांत १८ मुसलमान शाहिरांनीं केलेली रचना आहे. हें मुसलमानांचें जातीय साहित्य आहे. अशा प्रकारचें मुसलमानांचे जातीय साहित्य गांवोगांवीं असण्याचा संभव आहे. त्याचा इतिहाससंशोधकांनीं शोध घेतला पाहिजे. आणि मुसलमानी साहित्य - सेवक व मुसलमानी - साहित्य ह्यांची माहिती जनते पुढें मांडली पाहिजे.
N/A
References : N/A
Last Updated : March 26, 2017
TOP