बस्वलिंगकृत संत - मालिका

बस्वलिंगकृत संत - मालिका


( पै. शिकंदर लाल आतार )
ग्रंथमाला, काव्यसंग्रह, वगैरे मासिकांतून व कविता - ग्रंथांतून मागें बर्‍याच संतमालिका प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रस्तुत “ बस्वलिंगकृत संतमालिका ” मंडळापुढें ठेवीत आहे. ही अद्यापि अप्रसिद्ध आहे. अशा संतमालिकांतून नवीन नवीन संतांची व कवींचीं नांवें, त्यांची कामगिरी वगैरेंचे उल्लेख आढळतात व त्यांचा त्या कवींचा अथवा संतांचा कालनिर्णय करण्यासहि उपयोग होतो. प्रस्तुत संतमालिकेंत तुकारामापर्यंतच्याच संतांचा उल्लेख झालेला आहे. यावरून बस्वलिंग कवि तुकारामाच्या समकालीन होता; असें दिसतें. तुकारामाच्या नंतर अथवा समकालीं धामण गांवचा बोधला होऊन गेला, असें प्रस्तुत संतमालिका सांगते. यावरून बोधल्याच्याहि कालनिर्णयास मदत होते. यांत पुढील १७ कवि संतांचा उल्लेख आहे - (१) मुकुंदराज, (२) ज्ञानेश्वर, (३) निवृत्तिनाथ, (४) सोपानदेव, (५) मुक्ताबाई, (६) एकनाथ, (७) तुकाराम, (८) बोधला, (९) सावंतामाळी, (१०) नामदेव, (११) मीराबाई, (१२) जनी, (१३) भानुदास, (१४) गोरा कुंभार, (१५) कबीर, (१६) कानोपात्रा, (१७) आणि चांगदेव; शिवाय खालील २१ पौराणिक व्यक्तींचा नामनिर्देश आहे - हरिश्चंद्र, तारामती, श्रीयाळ, प्रल्हाद, शिबी चक्रवति, धर्म विदुर, रुखमांगद, भीष्म, हनुमंत, शुक, नारद्, वसिष्ट, विश्वामित्र, व्यासो नारायण, अंबकवि, वाल्मीकि, पुंडलीकं आणि विश्वपति.

बस्वलिंग कवि - कृत संत - मालिका

जैतपाळ राजा सातां प्रश्नाचि गोवि घातली ॥
माझ्या मुकुंदराजे साहि दर्शने सोडवीली ॥१॥
ज्ञानियांचा राजा ज्ञानदेव तो माझा भला ॥
रेडे याचे मुखें ज्याणे वेद जो बोलविला ॥२॥
व्यासाचा अवतार प्रगट जाला तो प्रतिष्टीनि ॥
एकनाथा घरीं देव श्रीखंड्य़ा वाहे पाणी ॥३॥
ध्वजे सकट गेला ऐसा ऐकिला नाहि कोणी ॥
माझ्या तुकोबाचे कागद बुडऊं न सके पाणी ॥४॥
रीति पेवें भरलि थोट्या ताटासी कणसें आलि ॥
माझ्या बोधल्याणे धामण गांवचि पंढरि केलि ॥५॥
अरण्यभेडिचा तो माझा सावंत माळि भला ॥
माझ्या विठोबाला ज्याणे उदरिं जागा दिला ॥६॥
पाशाणाचा देव ज्याणे भक्तिनें बोलविला ॥
माझ्या नामदेवें संगें बैसोनि जेवविला ॥७॥
पाछ्यायाची बेटि हरि - भक्तिचे भूषण ल्याली ॥
माजी मीराबाई ति काय विश्याचा प्याला प्याली ॥८॥
डोईच्या केल्या जटा नखा बोटाच्या केल्या चुंबळी ॥
माझी मुक्ताबाई ती काय वैराग्य बहु आगळी ॥९॥
हरिचंद्र राजा त्याची तारामति काय राणी ॥
आपल्या सत्त्वासाठीं डोंबा घरीं वाहे पाणी ॥१०॥
नामयाची जनी तिचें दासत्व पण नेलें ॥
माझ्या विठोबाने तिचे दळण - कांडण केले ॥११॥
सर्वां संतां माजी भानुदास तो भक्त भला ॥
माझ्या वीठोबाला तोहि सत्वर घेउनि आला ॥१२॥
गोर्‍या कुंभाराने पुत्र मातिंत तुडविला ॥
माझ्या विठोबाने त्याला संजीवन केला ॥१३॥
मोमीनाचे घरी ज्याणे शेवा गे बहु केली ॥
माझ्या कबिराचि सर्वांगाची गे पुस्पे जाली ॥१४॥
मानुरे नगरीं झुंडि पैगांबराचि आली ॥
माझ्या ज्ञानदेवें बाईं भीति गे चालविलि ॥१५॥
कांतिप नगरिं राजा श्रीयाळ तो चागुणा ॥
आपुल्या सत्वा साटि बाळ अतिता दिला भोजना ॥१६॥
मंगळवेडेचि माझी कानोपात्तर भली ॥
माझ्या विठोबाने तिची आंगाचि उठि केली ॥१७॥
वाटिचा ईस्वर चांगदेयाचे हातिं जाला ॥
चोडदासें वरुषें ज्याणे देह गे वाचविला ॥१८॥
अज्ञीमाजी गेला नाहि समुद्रासी गे भ्याला ॥
प्रहराद भाईंया जो कां विस जेउनि धाला ॥१९॥
सीब्र चक्रवति धर्म विदुर रखुमांगद ॥
भीस्म हनुमंत शुक देवादि गे नारद ॥२०॥
तेजें सुर्या ऐसी वसीष्टाचि गे तपे साटि ॥
माझ्या विस्वामिचे केलि श्रृष्टीवरी गे श्रृष्टी ॥२१॥
ऐ. सं. वाङ्. सा. खं. १-४
नीवृति सोपानचा बाई तीसरा गे ज्ञानेश्वर ॥
मुळ माया मुक्ताबाई चोगे देवाचे गे अवतार ॥२२॥
ऐसी संतमाळ नीत्य जपे जो प्रात्काळि ॥
सायुज्जता मुक्ती त्याचे अंगी गें सर्वकाळीं ॥२३॥
व्यासो नारायण अंबरुषी गे आणी वाल्मेक ॥
वीठोबा आणीला धन्य भक्त गे पुंडलिक ॥२४॥
वालमीकें शत कोटि ग्रंथ केला गे नसतां राम ॥
मुळ रुषी दोनी वसीष्ट पर्वात्री आणी नाम ॥२५॥
वीस्वपति यात्रे कर्म देवासी नवते पाये ॥
लवोलि यउनी भेटि दीली गे पंढरी रायें ॥२६॥
ऐसें संत महंत माझे सखे गे सज्जन ॥
भावें बस्वलिंगें तयां घातलें लोटांगण ॥२७॥

N/A

References : N/A
Last Updated : March 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP