ज्ञानराज माउली

संकीर्ण वाड्मय साहित्य.


ज्ञानराज माझी योग्याची माउली ।
जेणें निगमवल्ली प्रगट केली. ॥१॥
अध्यात्मविद्येचें दाखविलें रूप ।
चैतन्याचा दीप उजळीला. ॥२॥
गीता आळंकार नाम ज्ञानेश्वरी ।
ब्रह्मानंद लहरी हेलावली. ॥३॥
छपन्न भाषेचा केलासे गौरव ।
भवार्णवीं नाव उभारिली. ॥४॥
श्रवणाचे मिसें बैसावें येवोनी ।
साम्राज्य भोगोनी सुखी असा. ॥५॥
तुका म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी ।
येक तरी वोवी अनुभवा. ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP