लक्षणे - ८६ ते ९०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


८६
भावेंविण भक्ती भक्तीविण मुक्ती । मुक्तीवीण शांति आढळेना ॥१॥
भावें भक्ती सार भक्ती भावें सार । पावे पैलपार विश्वजन ॥२॥
भावभक्तीविण उद्धरला कोण । यालागी सगुण भक्तीभाव ॥३॥
रामदास म्हणे दक्ष ज्ञानी जाणे । भक्तीचीये खुणे पावईल ॥४॥

८७
भजनरहित ज्ञानें मोक्ष होणार नाहीं । सकळ निगम त्यंचें सार शोधूनि पाहीं । सगुणभजन मागें रक्षिलें थोरथोरीं । अधम नर तयांचें ज्ञान संदेहकारी ॥१॥

८८
भक्तीविण ज्ञान त्या नांव अज्ञान । जाणती सज्ञान संतजन ॥१॥
पायाविणें थोर केलें दामोदर । पावतां संव्हार वेळ नाहिं ॥२॥
तारूविण नांव तो नव्हे उपाव । ठाकवेना ठाव पैलथडी ॥३॥
रामदास म्हणे शुद्ध उपासनें । विश्रांती पावणें केवी घडे ॥४॥

८९
भजन रघुविरांचें पाहातां सार आहे । अगणित तुळणा हें सर्व कांहीं न साहे । भुषण हरिजनाचें ध्यान योगीजनाचें । स्वहित मुनिजनाचें गूज हें सज्जनाचों ॥१॥

९०
राघवाची भक्ती ज्ञानाचे मंडण । भक्तांचें भूषण राम येक ॥१॥
नलगे पिंडज्ञान नलगे तत्त्वज्ञान । राघवाचें ध्यान आठवितां ॥२॥
शब्दज्ञान पोथी वाचितां प्रबळे । मागुतें मावळे क्षण येका ॥३॥
रामीरामदासी राघवाची भक्ती । तेथें चारी मुक्ती वोळंगती ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP