लक्षणे - १०१ ते १०५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


१०१
संसारीचें दुःख मज वाटे सुख । राघवाचे मुख पाहतांचि ॥१॥
माझें सुख माझ्या राघवाच्या पाई । तेणें मी हृदई निवईन ॥२॥
आम्हां नाहिं चिंता संसारीं असतां । वाचे गुण गातां राघवाचे ॥३॥
रामदास म्हणे राम सीतापती । तेथें मी विश्रांती पावईन ॥४॥

१०२
जगीं धन्य जो रामसूखें निवाला । कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला ।
देहेभावना रामबोधें उडाली मनोवासना रामरूपीं बुडाली ॥१॥

१०३
ध्यान करूं जातां मन हारपलें । सगुणी जाहालें गुणातीत ॥१॥
जेथें पाहे तेथें राघवाचें ठाण । करीं चापबाण शोभतसे ॥२॥
रामरूपीं दृष्टीं जाऊनी बैसली । सुखें सुखावली न्याहाळीतां ॥३॥
रामदास म्हणे लांचावलें मन । जेथें तेथें ध्यान दिसतसे ॥४॥

१०४
कथानिरूपणें समाधी लागली । वामना त्यागिली अंतरीची ॥१॥
नाहिं आपपर कीर्तनीं तत्पर । मनीं सारासारविचारणा ॥२॥
अर्थारूढ मन श्रवण मनन । होय समाधान निजध्यास ॥३॥
रामी रामदासीं कथेची आवडी । लागलीसे गोदि नीच नवी ॥४॥

१०५
रामनामकथा श्रवणीं पडतां । होय सार्थकता श्रवणाची ॥१॥
मुखें नाम घेतां रूप आठवलें । प्रेम दुणावलें पाहावया ॥२॥
राम माझें मनीं शोभे सिंहासनीं । येकायेकीं ध्यानीं सांपडला ॥३॥
रामदास म्हणे विश्रांती मागेन । जीवाचे सांगेन राघवासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP