शिवरात्र - मित्रसह राजाची कथा
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
पंचम पूजनोत्तर
ब्रह्महत्यादि दोष जाती शिवार्चने । पर्वणी निमित्ताने घडे पुण्य ॥१॥
जरि पाठी उभी ब्रह्महत्या असे । कृपेने हरतसे शंकराच्या ॥२॥
भोळा देव शिव स्वये प्रगटत । ब्रह्महत्या करित दुरी जाणा ॥३॥
एक बिल्वपत्र किंवा ध्याने मन । अर्पितां दयाघन संतुष्टत ॥४॥
पत्र पुष्प तोय अर्पिली भक्तीने । घेत आनंदाने कृपाळु तो ॥५॥
कोणत्याही मिसे सेवन पडतां । होय मान्य करिता सदाशिव ॥६॥
मित्रसह राजा त्यासी अनुभव । हरी सदाशिव ब्रह्महत्या ॥७॥
विनायक म्हणे पापात्मा दारुण । मी तुज शरण मुक्त करी ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : January 21, 2020
TOP