शिवरात्र - गणांचे भजन
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
गिरिजेचे नांव जोडुनि शंकरा । गाताती साचारा गण तेव्हां ॥१॥
गिरिजेचे नांव ऐकतां ऐकतां । शिवा जाणीवता प्राप्त झाली ॥२॥
अंकीची पार्वती उठोनियां गेली । ऐशी स्मृति आली शंकराला ॥३॥
म्हणोनि कडीये उचलोनी घेती । नाचाया लागती घेवोनियां ॥४॥
करुं लागे धांवा, घाबरत बाळा । जागा रे स्नेहाळा होशी कदा ॥५॥
भलतेच काय आज आरंभिले । आक्रन्दन भले करीतसे ॥६॥
सकळ गणांसी हांक मी मारीत । दोघांसी पाहात गण तेव्हां ॥७॥
मातांपितरांसी पाहतां समवेत । तेच की गर्जत भजन जाणा ॥८॥
विनायक म्हणे आईबापधनी । जोडिले भजनी गणानी की ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : January 21, 2020
TOP