शिवरात्र - गणांची बेभानता

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


भजतां भजतां बेभान ते झाले । द्वैत विसरले मुळी आधी ॥१॥
आपण शिवरुप, ऐसेच मानिती । तैसेच वागती गण जाणा ॥२॥
आनंदाचा खेळ मांडिला कैलासी । खेळ निज छंदेसी खेळताती ॥३॥
शिवरुप झाले आनंदमूर्ति भले । शिवी मिसळले पूर्णत्वाने ॥४॥
जणूं जीवशिव ऐक्यरुप झाले । क्षणभरी गमले तैसे तेव्हा ॥५॥
विनायक म्हणे तोच येथे खेळ । खेळवो स्नेहाळ आम्हांलागी ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP