मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|शिवरात्र| ’भस्मावशेष मदनं चकार’ शिवरात्र विषय सेवा स्वीकारण्याबद्दल विनंती दाशार्ह कथा चांडाळाची कथा शिवदातृत्व शिवस्वरुप वर्णन मित्रसह राजाची कथा शिवनर्तन गणांची बेभानता बेभानतेची पराकाष्ठा गणांचे भजन गणांची तल्लीनता विनायकाचे मागणे विनायकाचा उद्धार ’भस्मावशेष मदनं चकार’ कार्य करवून घेतल्याबद्दल कृतज्ञतावचन शिवरात्र - ’भस्मावशेष मदनं चकार’ श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन ’भस्मावशेष मदनं चकार’ Translation - भाषांतर सप्तमपूजनोत्तरभट ऐसा नाही दुजा या जगती । अनुपम कीर्ति ज्याची असे ॥१॥त्याचीच उपमा त्याजला साजते । थोकडी पडते इतर जे का ॥२॥त्यासी प्रतिभट ब्रह्माण्डांत नाही । एकलाच पाही विजय पावे ॥३॥कोणी न कधी केले तेच याने केले । महिमान भले अनुपम ॥४॥अचिन्त्य कृत्यांचा एकची हा कर्ता । यासम परता कोणी नाही ॥५॥दुर्जय सकळां अवश हा मोठा । धैर्याचा की सांठा मूर्तिमंत ॥६॥सकल दुनियेते जेणे वश केले । दास बनविले ब्रह्मा विष्णु ॥७॥इंद्र चंद्र वंश थोर थोर मुनि । सकल जिंकोनी ठेविले की ॥८॥ज्याचा बाण कधी माघार न घेई । प्रतिपक्षाचा घेई, बळी, जो का ॥९॥ऐसा महायोद्धा प्रेरिला देवांनी । सकल देवोनी साह्य त्यासी ॥१०॥अकाली वसंत अप्सरांच्या संगे । जात असे मागे सहाय्यार्थ ॥११॥ऐसा पुष्पधन्वा वश करण्यासी । सवे पार्वतीसी देवोनीयां ॥१२॥पाठविती देव गिरि-कंदरासी । भूल बैरागियासी पाडावया ॥१३॥आम्रमंजरीचा बघुनीया भर । आकर्ण ओढी मार धनु निज ॥१४॥अप्सरा नाचती कोकिला आलापिती । वनदेवता वर्षती पुष्पभार ॥१५॥पार्वती करोनी सकल शृंगार । उभी राहे समोर बैराग्याच्या ॥१६॥अंगालागी भस्म वेष दिगंबर । समाधि-निर्भर योगिराज ॥१७॥त्यासी जिंकावया भूल पाडावया । साधावया देवकार्या पाठवीती ॥१८॥करितां टणत्कार निज धनुष्याचा । उघडिला साचा तृतीयनेत्र ॥१९॥बह्नि प्रगटला काम भस्म झाला । ढीग तेथे पडला भस्माचा की ॥२०॥तेव्हा पासोनियां कंदर्प-प्रतिभट । नम हे सुभट पडले की ॥२१॥तया शरण जातां कामबाधा नोहे । न छ्ळी तो पाहे शिवभक्ता ॥२२॥विनायक म्हणे कृपा संपादावी । मात्रा न चालावी कामाची की ॥२३॥ N/A References : N/A Last Updated : January 25, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP