शिवरात्र - बेभानतेची पराकाष्ठा

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


नाचतां नाचतां वसने गळाली । पार्वती लाजली, परती होई ॥१॥
अंकावरुनि गिरिजा, उतरतां शिव । झाले एकभाव गणांमाजी ॥२॥
गणी मिसळले नाचाया लागले । रंगोनियां गेले सदाशिव ॥३॥
त्यांचेही वसन गळोनियां गेले । क्रीडा-निर्भर झाले सदाशिव ॥४॥
अवघे दिगंबर नाचती खेळती । लज्जित पार्वती थोर होय ॥५॥
दुरुनी जाणवी वसन घ्यावया । त्यांचीये ह्र्दया कांही नसे ॥६॥
कांही न समजतां तैसेच नाचती । सुचवी पार्वती पुन: पुन्हां ॥७॥
विनायक म्हणे अवघे दिगंबर । शिव दिगंबर गाती जाणा ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : January 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP