भक्तिगीते - माधुरी

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


मधु निथळावा मम शब्दांतुनि
मधूर पाझर विचारातुनी ।
सदनांतील वावर किती सुखकारक ।
वर्तन सामाजिक, प्रिय सकलां ।
मधाळ वाणी, जिंव्हेवरतीं
प्राप्त सकल होईल, सर्वही ।
मज विनवी, प्रभु, प्रार्थि, मधुरतर ।
माधुर्याची ओतिव, मूर्ती
मधु, ओथंबित, पुष्परागीं
भ्रमर गुंग हो, तसे प्रेम दे ।
स्त्रोत झरावा, माधुर्याने ।
अखिल विश्व, ओसंडुनि वाहे ।
कूजन, विहगांचे मधुरस्वर ।
मंद पवन झुळझुळे धरेवर ।
नक्षत्रांसम, चमकति, पुष्पें ।
मधुर रसभरे, फलसंभारे ।
विकास जीवनि, निकोप सुंदर ।
कुंपण भवतालिही फुलोरा ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP