भक्तिगीते - वरद हस्त
गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.
- ओवी -
ज्ञानियांचा तो सागरु । नामदेवा, केला गुरु ।
जाति - वर्ण कवाडाला । उघडोनि पार केला ॥१॥
तोच अवघ्यांचा सहकार । यत्ने व्हावया उध्दार ।
वास्तु - रचना ती साकार । सगुण रुपे ठाकेल ॥२॥
पुण्यपत्तनाचे भूषण । रचना आदर्श हीच जाण ।
हेतू व्हावा परिपूर्ण । याविण परते न मागण ॥३॥
नाम गुरुंचे लाभले । ज्ञान - कुशल सामावले ।
निर्मल - सहकारी हस्तांनी । नगरी पावेल नामरुपी ॥४॥
वसा हाच अंतर्यामी । परिसीमा - प्रयत्न या कामी ।
धेय गाठण्या परिणामी । वरद - हस्त आम्हा लाभो ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : February 10, 2023
TOP