मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शब्द फुलोरा|भक्तिगीते| सहेली (वेणू) भक्तिगीते वीट साथ जीवन माझा सवाल विठ्ठला वारी आनंद विश्व नाते माधुरी श्रांत तुझे अढळपण राहिल कां रे ? सांज मागणे शांतता सहेली (वेणू) वरद हस्त भावार्थ (ज्ञानेश्वरी ) भक्तिगीते - सहेली (वेणू) गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा. Tags : g r ambekarshabda phuloraगो रं आंबेकरशब्द फुलोरा सहेली (वेणू) Translation - भाषांतर कटीं कालिंदी गोपाळ । वेणुनादें भारावले ।सात जन्माचीं पुण्याई । फळा आली, वेणुबोले ।कटिं, खोविलेली मला । दोन्ही करांत, वागवी ।पुलकित झाले अंग । स्पर्श सुखाचा, लाघवी ।अर्धे, मिटोनी लोचन । उभा, कटि मोडूनीयां ।सये, कैशीं सांगू पुढें ? चूर झाले, लाजुनिया ।बालपणीं मुखांमाजीं । दावियेले विश्वरुप ।तेच मुख जवळीं येतां । ब्रह्मीं जाहले, तद्रूप ।धून, तरंगावरणीं । विश्व घुमले, सुरांत ।असुरांना, ठाव कोठें । जग सारे आनंदांत ।वाहिलेला, देवकीनें । यशोदेनें वाढविला ।माझी, सहेलीची साथ । घननीळ, नादावला । N/A References : N/A Last Updated : February 10, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP