(१) दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा
(२) श्रीगुरुमहाराज गुरु जयजय परब्रह्म सद्गुरु
वरील कोणत्याही मंत्राचा बारा कोटी जप पूर्ण करावा. नियमपूर्वक मोजून एकाद्या वहीवर मांडून दररोज जप करीत जावे. जप करातांना कमलासन किंवा सिद्धासन घालून नीट बसावें. म्हणजे चित्तशुद्धि होईल. ( चंचल लक्ष्मीलासुद्धां कमलासनच प्रिय आहे. कारण ती कमलासनांतच स्थिर राहूं शकतें. अर्थात् कमलासन चंचल लक्ष्मीलासुद्धां स्थिरता देऊं शकतें. मग मनुष्याचें चंचल मन कमलासनांत कां स्थिर होणार नाहीं?)
समोर दत्ताची मूर्ति, तसबीर किंवा चित्र ठेवावें. नजर समोर किंवा नासिकाग्र असावी. म्हणजे, मन स्थिर होईल. अशा प्रकारें नियमपूर्वक एक एक कोटी जप पूर्ण करीत जावे. म्हणजे बाराव्या कोटीला मंत्रसिद्धि प्राप्त होईल. प्रत्यक्ष मंत्रदेवतेचें दर्शन होईल.