एकदा एक डुकरी आपल्या पिलांना जवळ घेऊन गवतात बसली होती. त्यांपैकी एखादे पिलू पळवावे, असा विचार करून एक लांडगा तेथे आला आणि म्हणाला, 'ताई, तुला बरं वाटत नाही असं दिसतं. तेव्हा तू थोडी मोकळ्या हवेत फिरून ये. तोपर्यंत मी तुझ्या पिलांना सांभाळायला तयार आहे.'
डुकरी म्हणाली, 'काही नको. मी गेल्यावर तू माझ्या पिलांना सांभाळण्याऐवजी खाऊन टाकशील हे मला माहीत आहे ! '
तेव्हा लांडगा मान खाली घालून निघून गेला.
तात्पर्य - काही माणसे दयाळूपणा दाखवून दुसर्याचा नाश करतात. त्यांच्यापासून सावध रहावे.