एकदा एका चिचुंद्रीने नाकात तपकीर घातली व ती आपल्या आईला म्हणाली, 'आई माझ्या कानात केवढा भयंकर आवाज येतो आहे. शंभर नगारे एकदम वाजल्यासारखं वाटतं आहे.'
तेव्हा तिची आई म्हणाली, 'किती बडबड करतेस? अशा साध्या गोष्टी सांगून रजाचा गज करण्याची ही सवय बरी नाही.'