एका बागेत एक लहानसा पोपट रहात असे. त्याची आणि एका चिमणीची खूप मैत्री झाली. ती चिमणी चिवचिव करीत इकडेतिकडे उडून खाणे मिळवीत असे आणि मग पोपटाशीं येऊन गप्पा मारीत बसे. पोपटाला ती खूपच आवडली. तो आपल्या आईला म्हणाला, 'आई, ही चिमणी बघ किती चांगली आहे. माझ्याशी किती छान वागते.
ते ऐकून आई म्हणाली, 'अरे आज तुला ही चिमणी चांगली वाटते आहे, पण नंतर हिवाळा सुरू झाला की तू थंडीत कुडकुडत बसशील आणि ही मात्र तुझ्यापासून लांब कुठेतरी मजा करीत असेल.'
तात्पर्य - कोणत्याही माणसाशी मैत्री करण्याआधी त्याच्या स्वभावाची चांगली पारख करून घ्यावी.