एकदा दोन तरुण मिठाईच्या दुकानात गेले आणि दुकानदाराचे लक्ष नाही असे पाहून त्यातील एकाने एक लाडू चोरला व दुसर्याच्या हातात दिला. ढिगाच्या वरचाच लाडू नाहीसा झालेला पाहून दुकानदाराला संशय आला व तो त्यांना म्हणाला- 'तुमच्यापैकी एकाने निश्चितच माझा लाडू चोरला आहे.' तेव्हा ज्याने लाडू चोरला तो म्हणाला, 'मी देवाची शपथ घेऊन सांगतो की, तुमचा लाडू माझ्यापाशी नाही.' ज्याच्या खिशात लाडू होता तो म्हणाला, 'देवाची शपथ, मी काही तुमचा लाडू चोरला नाही.
तात्पर्य - लबाडीने खरे भाषण करण्यात मोठेसे भूषण नाही. कृत्यातही खरेपणा पाहिजे.