एके दिवशी सिताफळ आणि रामफळ यांचे परस्परांच्या मोठेपणाबद्दल भांडण जुंपले. भांडता भांडता ती एवढ्या मोठ्याने बोलू लागली की, त्यांचे बोलणे एका अंजिराने ऐकले व तो म्हणाला, 'अरे, असे भांडता काय ? आपण सगळे एकमेकांचे मित्र आहोत. तेव्हा मित्रांनीच भांडणं योग्य नाही.'
तात्पर्य - स्वतःच्या मोठेपणाबद्दल दुसर्याशी वाद घालण्याची काही लोकांना सवय असते