एका शेतकर्याने साळुंकी व एक कवडा असे दोन पक्षी विकत आणले. साळुंकीला गाणे ऐकण्यासाठी आणि कवडा मारून खाण्यासाठी. त्याची बायको कवड्याची कढी करण्यासाठी पक्षी ठेवले होते तेथे गेली. परंतु अंधारात चुकून तिने कवड्याऐवजी साळुंकीलाच घेतले आणि आता तिची मान सुरीने कापणार इतक्यात त्या साळुंकीने गाणे सुरू केले व त्यामुळे तिचा प्राण वाचला.
तात्पर्य - पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय एखाद्याचा जिव घेणे पाप आहे. कारण ज्याला मारावयाचे त्याला सोडून आपण भलत्यालाच मारल्याचे नंतर लक्षात आल्यास ती चूक दुरुस्त करता येत नाही.