एकदा एक कावळा एका गरीब शेळीच्या पाठीवर बसून तिच्यावर चोची मारू लागला. तेव्हा शेळी त्याला म्हणाली. 'अरे, तू माझ्यासारख्या गरीबाला टोचतोस त्यापेक्षा जर कुत्र्याला टोचशील तर तू खरा.'
त्यावर कावळा म्हणाला, 'कुणालाही त्रास देण्यापूर्वी मी त्याच्याकडून आपल्याला त्रास होणार नाही ना असा विचार करतो. जे शक्तिवान आहेत त्यांच्या वाटेला मी कधीच जात नाही, पण जे दुबळे आहेत त्यांना मात्र मी भरपूर त्रास देतो.'
तात्पर्य - जो मनुष्य इतरांना त्रास देतो तो कुणालातरी भीतच असतो.