खंडोबाचे लग्न झाले तेव्हा सगळ्या पशुपक्ष्यांनी त्याला अनेक प्रकारच्या भेटी दिल्या. एका सापानेही आपल्या तोंडात एक गुलाबाचे फूल घेतले अणि तो खंडोबापाशी आला. ते पाहून खंडोबा त्याला म्हणाला, 'अरे, तू जी वस्तु मला देण्यासाठी आणली आहेस ती खूपच चांगली आहे पण ती तुझ्यासारख्या दुष्ट प्राण्याकडून घेणं मला योग्य वाटत नाही !'
तात्पर्य - वस्तु जरी कितीही चांगली असली तरी ती देणारा मनुष्य कोणत्या दर्जाचा आहे, हा विचार करूनच, तिचा स्वीकार करावा.