एक कोल्हा पाण्यात पोहत असताना बराच खाली गेला व दमल्यामुळे विश्रांती घेण्यासाठी तो एका चिखलाच्या जागी जाऊन बसला. तेव्हा त्याच्या अंगावर एक मोठा माशांचा थवा आला आणि त्याला चावू लागला. जवळच बसलेल्या एका साळूने त्याला विचारले, 'मी यांना हाकलून देऊ का ?' तेव्हा कोल्हा म्हणाला, 'नको ग बाई, इतका वेळ माझं रक्त पिऊन त्याचं पोटं भरलं असेल. तेव्हा आता त्या त्रास देणार नाहीत. त्यांना जर तू हाकलून लावशील तर मात्र ताज्या दमाचा दुसरा थवा माझ्या अंगावर येईल अन् माझं रक्त शेषू लागेल त्याचं काय ?'