एकदा एका कोल्ह्याने एका करकोच्याला आपल्या घरी जेवायला बोलावले आणि खिरीने भरलेले एक सुंदर ताट त्याच्यापुढे ठेवले. करकोच्याला लांब चोचीमुळे ते काही खाता येईना. कोल्ह्याने मात्र ताट चाटूनपुसून लख्ख केले. बिचारा करकोचा तसाच उपाशी राहिला.
थोड्या दिवसांनी करकोच्याने कोल्ह्याला मेजवानीस बोलावले व त्याची फजिती करावी म्हणून एका सुरईत आंबरस घालून त्याला दिला. सुरईचे तोंड खूपच लहान असल्याने कोल्ह्याला ते खाता येईना. करकोच्याने मात्र आपली लांब चोच खुपसून तो आंबरस संपवला.
तात्पर्य - दुसर्याची चेष्टा करून समाधान पावणे हे दुष्टपणाचे लक्षण आहे.