एक उन्मत्त चिलट एकदा एका सिंहावर हल्ला करून त्याच्या कानाला, नाकाला आणि डोळ्याला चावू लागले. त्या वेदनांमुळे सिंह जमिनीवर गडबडा लोळू लागला. त्याने त्या चिलटाला आपल्या पंजात पकडायचा प्रयत्न केला. पण ते काही सापडले नाही.
नंतर आपण कशी सिंहाची खोड मोडली म्हणू हसत ते चिलट उड्या मारीत असताना जवळच असलेल्या एका कोळ्याच्या जाळ्यात सापडले. त्यातून सुटण्याची त्याने बरीच धडपड केली, परंतु ते अधिकच अडकले.
तात्पर्य - सुखदुःख हे सगळ्यांनाच आहे.