एका शेतकर्याने एकदा एक डोमकावळा पकडला आणि त्याच्या पायात साखळी बांधून त्याने तो आपल्या मुलांना खेळायला दिला. तशा परिस्थितीत तो इतका कंटाळून गेला की एक दिवस तो त्या साखळीसकट रानात उडून गेला. परंतु, तेथे एका झाडाच्या फांदीला साखळी अडकल्यामुळे त्याला उडता येईना, भुकेने तडफडून मरण्याची त्याच्यावर वेळ आली. तेव्हा तो म्हणाला, 'अशा प्रकारे रानात भुकेने मरण्यापेक्षा, माणसाची गुलामगिरीसुद्धा पत्करली असती तर बरे झाले असते.'